Wednesday, July 14, 2021

मा. मोहन भागवतांचे कथन हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए सारखाच आहे.

मा. मोहन भागवत यांच्या कथना बाबतचा ऑर्गनायझर मधील लेख येथे वाचा.

प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मुस्लिम समाजाचा आणि हिंदू समाजाचा डीएनए एक आहे ह्या मा. भागवतांच्या विधनाने या वादळाला सुरवात झाली. या विधानाला भागवतांच्या दुसऱ्याही विधानांनी दुजोरा मिळाला. मुख्य म्हणजे या वादाला यावेळी नेहमीच्या लेफ्ट लिबरल लोकांनी विरोध केला नसून हिंदू विचाराच्या आणि हिंदू हित पहाणाऱ्या लोकांनी विरोध केला आहे. 

विरोधाला कारण असे आहे की. कुठल्याही माणसाच्या डीएनए सारखा असल्याने त्यांचा विचार सारखा असतोच असे नाही. दोन सख्ख्या भावात विचारांची मतभिन्नता असते. त्यामुळे मा. भागवतांची डीएनए ची उपमा योग्य नाही. दुसरेही मा. भागवतांना दाखवून देण्यात आले की मुहम्मदाने त्याच्या चुलत बंधूंची आणि काकांची हत्त्या त्यांनी इस्लाम स्वीकारला नाही म्हणून केली. एव्हढेच नव्हे तर ज्या अबू तालेबने मुहम्मदाची अखंड पाठराखण केली पण इस्लाम स्वीकारला नाही त्याला त्याच्या मृत्यु समयी इस्लाम स्वीकारला नाही याबद्दल मुहम्मदाने लांछनच लावले. मुहम्मदाच्या चुलत बंधूंचा आणि काकांचा आणि मुहम्मद पैगंबरांचा डीएनए एकच होता. त्यामुळे डीएनए एक असल्याने मुस्लिम तुमच्याशी चांगले वागतील हा भ्रम आहे.  

कुराण हा मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ ज्यात अल्ला या देवाने महम्मद पैंगवराना काय आदेश दिले आहेत? "It is not for the Prophet, and those who believe, to pray for the forgiveness of idolaters even though they may be near of kin (to them), after it hath become clear that they are people of hell-fire." (Q. 9:113)  महत्वाचे शब्द near kin तुमचे स्वतःचे जवळचे नातेवाईकही असले तरीही ते दोजकच्या (नरकाच्या) आगीत जळतील. प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे की त्याने कुराणाची आज्ञा पाळली पाहिजे. आता भागवतांच्या डीएनए साधर्म्याच्या वक्तव्याने मुस्लिम लोक त्यांच्या कुराणाला सोडणार आहेत का? भागवतांच्या विधानाला कोणीतरी मुसलमानाने पाठिंबा दिला आहे का? अगदी ज्या कार्यक्रमात ते बोलत होते त्या कार्यक्रमातील लोकांनी तरी त्यांना पाठिंबा दिला आहे का? कोणी त्यांना प्रश्न विचारला आहे का?

मा. भागवतांनी मा. गोळवलकर यांच्या "If, even after fulfilling all those various duties in social life, anybody says that he has studied Quran Sharif or the Bible and that way of worship strikes a sympathetic chord in his heart, that he can pray better through that path of devotion, we have absolutely no objection." या विधानाचा पुनरुच्चार केला आणि संघाची ही भूमिका फार पूर्वी पासून होती याचा पुनरुच्चार अभिमानाने केला आहे. यात खरी गोष्ट अशी दिसून येते की कुराण आणि बायबलमधे काय म्हटले आहे याबद्दल या दोघांनाही माहिती नाही किंवा माहित असूनही त्यांना त्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले आहे. 

भागवतांनी आणखीही असे विधान केले की हिंदूही निराकारी परब्रह्माची उपासना करतात. त्यामुळे एका अल्ल्हाच्या उपासना तुम्ही केल्याने हिंदूना काहीही फरक पडत नाही. हे विधान अत्यंत अज्ञान मूलक आहे कारण परब्रह्म आणि अल्ला यांच्यात जमिन अस्मानाचा फरक आहे. अल्ला जे काही बोलला आहे ते मुहम्मद पैगंबरांच्या तोंडून बोलला आहे ते कुराणरुपी आयतांमधे लिहिलेले आहे. हा अल्ला नावाचा देव मुस्लिमांना काय उपदेश करतोय हे कोणी कधी अभ्यासलेच नाही का? वरती दिलेली (Q. 9:113)  एक आयतच हे सांगण्यास पुरेशी आहे. अश्या शेकडो आयती आहेत. मध्यंतरी श्री. वसीम रिझवी यांनी कोर्टात२६ आयतीं कुराणातून काढून टाकण्यासाठी याचिका केली होती. अनेकांनी त्यांना विचारले की २६ आयतींवरच का थांबलात? अजून शेकडो अश्या आयती आहेत ज्या समाजात शांतता नांदण्याच्या दृष्टीने अयोग्य आहेत.

परब्रह्म आणि अल्ला यात काहीही साम्य नाही. अल्ला हा अत्यंत संशयी, सारखा तुमच्यावर दंडा उगारणारा लोकांमधे भेदभाव करणारा, स्रीयांना हीन लेखणारा अन्याय करणारा देव आहे. पण आर एस एस चे नेतृत्व या बाबत काहीही जाणत नाही हे दिसून येते. 

आपल्या संघटनेच्या उच्च पदस्थांच्या विधानांची पाठ राखण करणे हे प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्याचे कर्तव्य असते आणि तसे अनेक जण करत आहेत. पण आपले लक्ष वेधू इच्छितो की मीही एक संघ स्वयंसेवक होतो आणि आणिबाणीच्या काळात संघ स्वयंसेवक आंदोलन केले होते आणि म्हणून रत्नागिरीच्या तुरुंगात तीन महिने होतो. चिपळूण मधील अनेक संघ स्वयंसेवक याची साक्ष देतील. पण आपल्या बुद्धीच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट तपासून पहाण्याची सवय असल्याने मी मा. भागवतांच्या विधानाला मूकपणे पाठिंबा देऊ इच्छित नाही.  मा. भागवतांच्या भाषणाची पाठराखण करणाऱ्या लोकांनी हे प्रश्न विचारत घेतले आहेत का? 

यात आणखी पुढची पायरी भागवतांच्या विधानाची पाठराखण करणारे गाठत आहेत. हे प्रश्न विचारणाऱ्याची संभावना  "Elevated Hindus", "RSS haters" (Prafull Ketkar in Organizer) अशी क्षणात करायला तयार आहेत, पण काफीराच्या अंताचा संदेश देणाऱ्या कुराणाचा मार्ग मुस्लिमांना पत्करावा असे मा. भागवत म्हणत आहेत त्याला पाठिंबा देत आहेत. काय म्हणायचे याला? 

मी फारच छोटा माणूस आहे. पण स. ह देशपांडे, सीताराम गोयल, राम स्वरुप, कॉनरॉल्ड एल्स्ट, शंकर शरण, डॉ. श्रीरंग गोडबोले, जयपूर डायलॉगचे संजय दीक्षित हे हेच लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करत होते पण त्यांचीच अवहेलना संघाच्या उच्चपदस्थांनी आणि उच्चपदस्थांच्या विचारांना आंधळा पाठिंबा देणारे करत आहेत. सीताराम गोयल आणि राम स्वरुप यांची अवहेलना संघाने दुर्लक्ष करुन केलीच पण त्यांच्या हिंदूहिता बाबातही ते कायम संशयी राहिलेत. आजही आहेत. 

ज्यांच्या बाबत संशयी असायला हवे त्यांच्याशी जुळवून घ्यायला तयार, पण सावध व्हा हे सांगणारे मात्र संघाचे वैरी...हे गांधीजीं सारखेच वागणे नाही का झाले? त्याग फक्त हिंदूनीच करायचा, शांततेची हमी नसतांना. अगदी परवाच, Sanghi Who Never Went to Shakha हे पुस्तक लिहिणारा राहूल रोशनही म्हणतो की संघाने या बाबातीत स्पष्टता आणली पाहिजे. हे पुस्तक वरील लिंक वरुन मिळेल. जरुर वाचण्यासारखे आहे. 

दुसरी महत्वाची गोष्ट  येथे लक्षात आणून देण्यासारखी आहे. इस्लाममधे जवळ जवळ ७२ पंथ आहेत. हे सगळे एकमेकात मारीमारी खुना खुनी करतात, पण काफीराबरोबर कसे वागायचे याबाबत त्यांच्यात कुराणातल्या आयतींबाबत मात्र पूर्ण एकमत आहे. याचे पुरावे हवेच असले तर देता येतील.  त्यामुळे मुस्लिमांमधील वेगवेगळ्या समुदायांशी बोलतांना असे बोलले हे म्हणण्यालाही काही अर्थ नाही. 

इंटरनेटमुळे आज माहित्याच्या प्रसारामुळे कुराणात काय म्हटले आहे, हदीसमधे काय म्हटले आहे ते कोणालाही अभ्यासता येते. या माहित्याच्या प्रसारामुळे इस्लामपुढे अस्तित्वाचे मोठे आवाहान उभे राहिले आहे. आजपर्यंत ही माहिती मुस्लिम लोकांनाच नव्हती. त्यामुळे इस्लाम म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी त्यांना मुल्ला मौलवी यांच्या सारख्यावरच अवलंबून रहावे लागायचे. पण आज कुराणाची आणि हदीसची भाषांतरे इंटरनेटवर उपलब्ध असल्याने सर्वसामान्य मुस्लिमही ते वाचतो आणि त्याच्या मनात इस्लाम बद्दल संशय निर्माण होतो आहे. अनेक मुस्लिम धर्मगुरु हे मानतात की या माहितीच्या स्फोटाने इस्लामपुढे धर्म संकट उभे राहिले आहे. असे म्हटले जाते की इस्लाम नाकारणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. काही सर्व्हे असे सांगतात की काही मुस्ल्मि देशांत १५ ते ३० टक्के लोक इस्लाम मानत नाहीत. 

परवाच सौदी अरेबियाचे राजपुत्र मुहम्मद बीन सलमान यांनी अत्यंत धाडसी विधान केले की ते कोणतीही हदीस मानत नाहीत कारण त्या मुहम्मदाच्या मृत्यु नंतर २०० वर्षांनी लिहिल्या आहेत आणि त्या आधुनिक समाजासाठी योग्य नाहीत. मुह्हमद बीन सलमान यांनी तर पुढे जाऊन हेही म्हटले की कुराणालाही परत लिहायची गरज आहे. एकीकडे इस्लामी जगतात ही घुसळण घडत आहे, पण वैचारिक भोंगळतेमुळे ज्याच्यावर काफीर असण्याचे भोग भोगायला लागतात ते मात्र कमी माहितीमुळे किंवा सैद्धांतिक हट्टामुळे चुकीचे निर्णय घेत आहेत. 

या सगळ्या समोर आर एस एस चे उच्च नेतृत्व भारतातील त्याच मुल्ला, मौलवी आणि अश्राफ लोकांना जे सर्वसामान्य मुस्लिमांना दहशतीने आपल्या अंकीत ठेवतात त्यांनाच हाताशी धरुन परब्रह्म आणि अल्ला एक, तुम्ही (पवित्र?) कुराणाप्रमाणे वागा असले सल्ले देत आहेत. यामुळे इस्लाममधे जी घुसळण चालू आहे त्याची काहीच माहिती हिंदू नेतृत्वाला नाही. यामुळे एक लक्षात येते की हजार वर्षांच्या आक्रमणा नंतरही हिंदू नेतृत्वाला इस्लामच्या बद्दल, हदीसींबद्दल, कुराणाबद्दल काहीही माहिती नाही किंवा माहीत असूनही ते त्याकडे कानाडोळा करतात. तसेच सध्या इस्लाममधे काय वादळे होत आहेत या बद्दलही माहीत नाही. 

पण हे असे का? पुन्हा विभजनाची भीती? हत्या आणि दंगली यांची भीती? तुम्ही काहीही केलेत तरी जेथपर्यंत इस्लामी विचारात बदल घडत नाही तो पर्यंत काफीरांच्या नशीबी हेच असणार हे संघ नेतृत्वाल कळत नाही, की समजून घ्यायचेच नाही? काश्मिर, पश्चिम बंगाल, केरळ येथील हिंसाचार हेच तर सांगतो. भारतातील मुस्लिमांना त्यांच्या धर्मशास्त्राबद्दल खडे बोल कोण सुनावणार? संघाने हे नेतृत्व करावे ही अपेक्षा करणारे हे हिंदू विरोधी आणि लेफ्ट लिबरल कसे?

युट्युब आणि इंटरनेटवर इस्लाम सोडणाऱ्यांची संख्या, इस्लामवर टीका करणाऱ्यांची सख्या प्रचंड आहे. त्यांचे सर्वसामान्य लोकांना आणि विशेषतः मुस्लिमांना जागे करण्याचे आणि इस्लामचे खरे स्वरुप लोकांना दाखवण्याचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. हिंदू नेतृत्व मात्र या बाबत अनभिज्ञ आहे. 

दुर्दैव हे की या बद्दल सावध व्हा हे सांगणाऱ्यांची मात्र संघ, संघ पाठिराखे उपेक्षा नव्हे, तिटकारा करतात. का? तर गोळवलकर गुरुजींनी सांगितलेली भूमिकाच आम्ही चालवत आहोत हे कौतुकाने सांगतो. हे काही भूषणावह नाही. त्यांना त्यावेळी उपलब्ध असलेल्या माहितीवर त्यांनी त्यांची भूमिका घेतली आता ती बदलता येणार नाही हे हट्टाने सांगणे हे काही सतत विचारी असणाऱ्या संघटनेचे लक्षण नाही. संघाला बौद्धीक चर्चांचे वावडे आहे असे काही लेफ्ट लिबरल कुत्सितपणे म्हणतात. आपल्या आग्रही हटवादी भूमिकेमुळे संघ हे सिद्ध तर करत नाही?

No comments:

Post a Comment